JOB OR BUSINESS
Job or Business?
ह्या ११ गोष्टींचा विचार जर तुम्ही केला तर...नोकरी करावी की व्यवसाय करावा ह्याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल !
१ - नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो...त्याला बदलल्याशिवाय
तुम्ही जास्त लांब जाऊ शकत नाही
२- काही लोकांना गोष्टी त्यांच्यासाठी कोणीतरी कराव्या असं वाटतं काही लोकांना गोष्ट आपोआप घडतील असं वाटत असते..पण काही लोकं गोष्टी स्वतः घडवून दाखवतं
3 गुलामी करायची एकदा सवय झाली...की प्रत्येक जण आपली ताकत विसरतो...
४- ह्या ४ गोष्टी शाळेत शिकवत नाहीत
*पैश्याचे स्रोत कसे निर्माण करायचे ?
*व्यवसाय कसा आणि कुठला करायचा?
५- लोक अपयशी का राहतात ?
१. ते ध्येय ठरवत नाहीत
२. ते इतरांना दोष देतात
3. ते सबबी सांगतात
४. गुंतवणूक करीत नाहीत
५. खूप खर्च करतात
६. बजेट ठरवत नाहीत
७. दिखाऊपणा करतात
८. स्वतःमध्ये गुंतवणूक करत नाहीत
९. ज्या गोष्टी परवडत नाहीत त्या घेतात
१०.शिक्षण थांबवतात.
६- तुम्हाला यश का मिळत नाही ?
* चालढकल करणं - आजच काम उद्या वर ढकलणे.
* मल्टीटास्किंग - एकाच वेळेस अनेक कामं करणे.
* योग्य ज्ञान न मिळणे - आपल्या क्षेत्रातील ज्ञान नसणे.
* आळस - कामं टाळणे.
* त्याग न करणे - आवडत्या गोष्टी सोडून न देणे.
* निश्चित दिनक्रम नसणे - कामाचा आराखडा तयार न करणे.
७ - ह्या गोष्टी प्रत्येकाला कायम ऐकाव्या लागतात
* तू कधी हे करू शकणार नाही
(तुमच्या समोर बोलतात)
* याला वाटत हा खूप हुशार आहे.
(तुमच्या मागे बोलतात)
* व्ययसायात यश मिळवणं एवढं सोपं नाही.
(तुमचा आत्मविश्वास संपवण्यासाठी बोलतात))
* ह्याच नशीब चांगलं आहे.
(तुम्हाला यश मिळताना पाहून बोलतात)
* आम्हाला माहित होत तू यशस्वी होणार
(तुम्ही सगळं मिळवल्यावर बोलतात)
८ - यश मिळवण्यासाठी काय कराल ?
* चुकीची कर्ज घेऊ नका.
* कठोर मेहनत करा.
* १ पेक्षा जास्त उत्पनाचे स्रोत निर्माण करा.
* निश्चित योजना बनवा.
* सतत शिकत राहा.
सर्वात महत्वाचं.
* योग्य व्यक्तीची मदत आणि मार्गदर्शन घ्या.
९- आपणा सर्वांकडे समान कौशल्य नाही पण,
ते कौशल्य विकसित करण्याची समान संधी मात्र आहे...
आज काल नोकरी मिळणे कठीण झाले आहे
नोकरी करून फक्त गरजा पूर्ण होऊ शकतात,
स्वप्न नाही !!
त्यामुळे आमचे वैयक्तिक मत की,
नोकरी पेक्षा व्यवसाय करावा.
१०- व्ययसाय सुरु करण्याआधी हे प्रश्न स्वतःला विचारा...
* तुमच्याकडे कोणती कौशल्य आहेत?
* तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे?
* कोणत्या क्षेत्रावर तुमचे प्रभुत्व आहे?
* तुमच्याकडे किती भांडवल आहे?
* किती काळ तुम्ही तोटा सहन करू शकता ?
* व्यायसायासंबंधी सर्व अभ्यास केला आहात का ?
* व्यायसायिकाची मानसिकता, संयम तुमच्याकडे आहे का?
११- * उद्या हे सुरू करेन
* उद्या वेळ येईल
* उद्याला या जगात काहीच स्थान नाही जे काही आहे आज आहे
काळजी कराल तर स्वतःलाच जाळून घ्याल,
प्रयत्न कराल तर उजळून निघाल...!!!
नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे. तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.
Click here to Subscribe YouTube channel :- Electrical License
Like Me On Facebook :-
Email Me At :- kulkarnikishore@yahoo.com
अधिक माहितीसाठी,
करंट केअर फाऊंडेशन , पुणे
संपर्क : 9371083034
Comments
Post a Comment