#Contractor #License #in_Maharashtra, Eligibility, Documents

ह्या ७ गोष्टीं तुमच्याकडे असतील तर तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढू शकता.

१- तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लायसन्स कधी काढू शकता?

जेव्हा इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसन्स असेल तेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढू शकता.

जर तुमच्याकडे सुपरवायझर लायसन्स नसेल आणि तरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढायचे असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल सुपरवायझर कामाला ठेवून कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढता येते.

२-तुमच्या फर्म अथवा कंपनीच्या नावाची मंजूरी कुठून घेता येते ?

लायसन्स काढण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या फर्म अथवा कंपनीच्या नावाची मंजूरी विद्युत निरीक्षण कार्यालयातून घ्यावी लागते.

-नावाची मंजूरी मिळाल्यावर त्या नावाने शॉपऍक्ट काढून घ्या.

- शॉपऍक्ट काढल्यानंतर नॅशनल बँकेत करंट अकाऊंट उघडा.त्यात कमीतकमी १० हजार बॅलन्स ठेवावा लागतो.

५- तुमच्या फर्मच्या नावाने मेगर आणि अर्थ टेस्टर खरेदी करावा लागतो.

- सगळ्या डॉक्युमेंट्सची झेरॉक्स जोडून लायसन्सी बोर्डाच्या फॉरमॅट प्रमाणे फाईल तयार करावी लागते. त्या सोबत ₹२५००/- शासकीय शुल्क भरावे लागते.

- तयार झालेली फाईल विद्युत निरीक्षक कार्यालयात व्हेरिफिकेशन करून इनवर्ड केल्यावर (जर त्यात काही त्रुटी नसल्यास)त्यांनी दिलेल्या कालावधी मध्ये लायसन्स मिळते.


 नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे. तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.


Email Me At :- kulkarnikishore@yahoo.com


अधिक माहितीसाठी

करंट केअर फाऊंडेशन , पुणे 

संपर्क : 9371083034

 

Comments

  1. सर मला लायसन्स काढायचे आहे BE electronic

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#Wireman #Licenses

#Electrical #Supervisor #License