#Electrical #Supervisor #License

इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसन्स काढण्याची माहिती





1. कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सूट मिळते ?

- ज्यांचे शिक्षण B.E., D.E. इलेक्ट्रिकल + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव  किंवा ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड + वायरमन लायसन्स+Apprenticeship pass+ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव ह्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सूट मिळते.



2. कोणत्या विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते ?

A] B.E., D.E. Electronics & Telecommunication / Mechanical + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव , किंवा ITI वायरमन ट्रेड किंवा १२ वी पास MCVC (J4,J5,J6 विषय असणारे) + वायरमन लायसन्स + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे २ वर्षाचा अनुभव ह्या विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते.


 NON TECHNICAL विद्यार्थ्यांसाठी  

B] वायरमन लायसन्स (Non Technical)  + १०वी पास + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे एकूण ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते.

कॉन्ट्रॅक्टर लायसन्स ↓ 

https://electricallicenseinmaharashtra.blogspot.com/2021/05/blog-post.htm


 नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे.  तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.

अधिक माहितीसाठी

करंट केअर फाऊंडेशन , पुणे 

संपर्क : 9371083034

Comments

  1. Electrical supervisor che license Sathi apply. Kut krayche

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या जिल्ह्यातील विद्युत निरीक्षक कार्यालयात ( Electrical inspector Office)

      Delete
  2. हॅलो सर,
    माझे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालेले असून बाहेरून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चां डिप्लोमा शेवटचे सेम चालू आहे.आणि माझाकडे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर एक्सपरियन्स
    3 वर्षाचा आहे.तरी मला डिप्लोमा इलेक्ट्रिकल पूर्ण झाल्यावर इलेक्ट्रिकल सुपर्विसोर परीक्षेतून सूट मिळू शकते का

    ReplyDelete
    Replies
    1. बाहेरून डिप्लोमा झाला असेल तर त्याला परीक्षा ही देता येत नाही.ज्यांचा रेग्युलर इलेक्ट्रिकल डिप्लोमा झाला असेल त्यांनाच परीक्षेतून सूट मिळते.

      Delete
    2. डिप्लोमा रेगुलर मोड मधे च आहे under MSBTE.

      Delete
  3. Sir tumchyakade anubhav milel ka

    ReplyDelete
  4. Sir mazi BE Electrical zali ahe..tr mla direct contractor ch liscence bhetu shakat ka ..

    ReplyDelete
  5. Sir supervisor liscence kadnyasathi kharch kiti yeto .. pls comment

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#Wireman #Licenses

#Contractor #License #in_Maharashtra, Eligibility, Documents