Electrical License

      


ह्या ११ गोष्टींची तयारी करून तुम्ही तुमचं स्वतःचं "इलेक्ट्रिकल एम्पायर" निर्माण करू शकता...



१) तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करताय पण तुमचं शिक्षण टेक्निकल क्षेत्रातील झालेले नाहीये    तर  तुम्हाला परीक्षा देऊन लायसन्स काढावं लागेल.

२) तुमचं शिक्षण इलेक्ट्रिकल आय.टी.आय., डिप्लोमा, डिग्री झालेलेअसेल तरी तुम्हांला लायसन्स काढणं गरजेच आहे.

३) तुमचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल डिप्लोमा ,डिग्री या क्षेत्रात जरी झाला असेल तरी तुम्हाला परीक्षा  देऊन सुपरवायझर लायसन्स काढावं लागेल.


 ४) वायरमन लायसन्स काढून सुपरवायझर लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढावं लागेल.

  


५) इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढले की पी.डब्ल्यू.डी., एम. एस. ई.डी. सी. एल. व इतर गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर तुम्हांला टेंडर्स भरता येतात.

६) व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम तुम्हाला भांडवल उभं करावं लागतं


७) मोठी कामे / टेंडर्स तुम्हाला मिळाल्यानंतर ती कामे करण्यासाठी कामगारांचीही तुम्हाला सोय करावी लागते.



८) काम सुरू करण्यापूर्वी इलेक्ट्रिकल मार्केटचा तुम्हांला सर्व्हे करावा लागतो.

९) इलेक्ट्रिकल क्षेत्रातील कुठला व्यवसाय करावा ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल याचाही अभ्यास करावा लागतो.

१०) येत्या १० वर्षात इलेक्ट्रिकल क्षेत्रात होणाऱ्या नाविन्यपूर्ण बदलांचाही अभ्यास करावा लागतो.

११)इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला तुमचं स्कील, नॉलेज, सर्व प्रकारचे लायसन्स,गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन आणि व्यवसायासाठी लागणारे भांडवल या सगळ्यांचा योग्य प्रकारे अभ्यास व तयारी करावी लागते.

या सर्व गोष्टींची तयारी करून तुम्हाला तुमचं स्वतःचं इलेक्ट्रिकल एम्पायर निर्माण करायची मनापासून इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रुपये १४९९/- भरून तुम्ही "मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर" ह्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकता आणि येत्या ती वर्षात तुम्ही तुमचं स्वतःचं इलेक्ट्रिकल एम्पायर निर्माण करू शकता.

 




"मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर"
बद्दल थोडक्यात माहिती 


    नमस्कार... 
    मी किशोर कुलकर्णी 
( गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर )

१९९६ पासून इलेक्ट्रिकल क्षेत्रात कार्यरत आहे.मला माझं स्वतःचं साम्राज्य निर्माण करायला २४ वर्ष लागली.काम करताना माझ्या लक्षात आलं की इलेक्ट्रिकल क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे गरजेचं आहे.तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो.त्याचबरोबर इलेक्ट्रिकल लायसन्स असणं ही तितकच गरजेचं आहे.

१३ फेब्रुवारी २०१५ ला मी "करंट केअर क्लासेस"ची स्थापना केली.ज्या मार्फत वायरमन व इलेक्ट्रिकल सुपरवायझर परीक्षेचे क्लासेस घेऊन अनेक विद्यार्थी पास होऊन स्वतःचा व्यवसाय व चांगली नोकरी करत आहेत.

https://www.facebook.com/pg/The-Current-Care-Classes-921066601287181/community/

२१ ऑगस्ट २०१८ ला माझ्या वाढदिवसादिवशी सकाळी सकाळी आमच्या असोसिएशनच्या ग्रुपवर १३ वर्षाच्या पृथ्वीराज चव्हाण ह्या मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची बातमी वाचली.त्याच दिवशी मी संकल्प केला की इलेक्ट्रिकल क्षेत्रातील होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मी कार्य करणार .त्या संकल्पामुळे १८ऑगस्ट २०२०ला मी "करंट केअर फाऊंडेशन"ची स्थापना केली.संपूर्ण महाराष्ट्राला अपघातमुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे.

Link ; https://www.facebook.com/Current-Care-Foundation-108428047597626/

हे सगळं करत असताना माझ्या हे लक्षात आलं की जर मला माझ्या सुरवातीच्या काळात जर कोणी योग्य मार्गदर्शन केले असते तर मी माझं स्वतःचं एम्पायर २००० सालीच निर्माण केलं असतं.

मला आलेले अनुभव भावी पिढीला येऊ नये.म्हणून येत्या ३ वर्षात मी १ लाख "इलेक्ट्रिकल एम्पायर" निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.त्यासाठीच "मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर"ची स्थापना केली आहे.



 नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे.  तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.


Mobile no: 9371083034


Comments

  1. Khoop chan mahiti sangitlit sir blog chya madhyamatun.

    ReplyDelete
  2. Khupch Chaan Sir
    Tumhi Dileli Mahiti he Amulya aahe aani
    Tumchya Guidence ne Aamchya Sarkhya Mulana Contractor Ship madhe khupch Fayada hoil.
    Aani Mission Electrical Empire cha me ek Bhag aslyamule mla yacha khup Abhiman aahe.
    Thank You so much sir... ����

    ReplyDelete
  3. Very well. Good Process and less efforts from user.

    Kishor sir and Team supports very well. End to end support.

    From exam to contractor license and PWD registration and all process.

    Thank you sir for valuable help and nice blog.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#Wireman #Licenses

#Contractor #License #in_Maharashtra, Eligibility, Documents

#Electrical #Supervisor #License